श्रीमती प्रभावती रामचंद्र शेठ पुण्यतिथी साजरी
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
आज जनसेवा प्रतिष्ठान संचालित श्रीमती प्रभावती रामचंद्र शेठ शाळेत स्वर्गीय श्रीमती प्रभावती रामचंद्र शेठ यांची 12 वि पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी स्वर्गीय श्रीमती प्रभावती रामचंद्र शेठ यांच्या प्रतिमेला श्री.मिलिंद शहा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व श्री सचिन शेठ शैलेश तलाठी दीप प्रज्वलन करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी सर्व मान्यवर व शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले या दिवसाच्या औचित्य साधून वृक्ष लागवड माननीय अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मांढरे सर यांनी शाळेविषयी आपले मनोगत मांडले इतर शाळांप्रमाणे फक्त नाव न देता माननीय अरुण भाई शेठ यांनी शाळेची संपूर्ण जबाबदारी आजपर्यंत घेत आहेत आणि म्हणूनच आज पोलादपूर सारख्या शहरात शाळा अग्रेसर आहे याचा सार्थ अभिमान वाटतो .यानंतर उपशिक्षक सौ कोसबे व सौ वीरकर मॅडम यांनी स्वतः काव्यरचना करून त्यांचे विषयी काव्य गायन केले. त्यानंतर सौ जाधवर सौ दरेकर मॅडम यांनी त्यांच्याविषयी आपले सुंदर विचार मांडले जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष श्री मिलिंद शहा यांनी मातोश्री श्रीमती प्रभावती रामचंद्र शेठ यांच्या शांत प्रेमळ व संस्कार क्षम स्वभाव व अरुण भाई शेठ यांच्या कार्याविषयी व स्वभावाविषयी आपले विचार मांडले . यावेळी श्री शैलेश तलाठी यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमास मातोश्री श्रीमती प्रभावती रा शेठ यांचे ज्येष्ठ नातू व संस्थेचे विश्वस्त श्री.सचिन शेठ उपस्थित होते
या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक श्री अजय येरुणकर सर यांनी सुंदर शब्दांकनात केले तर कार्यक्रमाची सांगता शाळेच्या शिक्षिका श्रीमती सावंत मॅडम यांनी केली शेवटी मुलांना गोड खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी सौ भोये मॅडम व श्री नरे व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता