उरणमधील निसर्गप्रेमी हितेंद्र घरत यांच्याकडून दहा लाख बियांचे रोपण
रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण
सिडको अधिकारी तसेच निसर्ग प्रेमी गडप्रेमी हितेंद्र घरत हे वेगवेगळ्या डोंगरावर गेली 25 वर्ष बिजारोपण करीत आले आहेत. यंदा 26 व्या वर्षी खारघर येथील फणसवाडी येथील डोंगरावर मान्यवरांच्या उपस्थितीत 10 लाख बीजांचे रोपण करण्यात आले.
आपल्या देशात व राज्यात वाढत्या औद्योगिकारणामुळे निसर्ग लोप पावत चालला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल ही ढासळत चालला आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच सोसावे लागत आहे. यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उरणमधील निसर्गप्रेमी हितेंद्र घरत हे गेली 25 वर्षे फळांच्या हजारों बिया गोळा करून त्या पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला अथवा किल्ले-रानावनात टाकीत आहेत. त्यातील शेकडोंच्या संख्येने झाडे जगून याचा फायदा तुम्हा आम्हाला व प्राण्यांना तसेच निसर्गाचीही जपवणूक करण्याचा त्यांचा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. त्यांच्या या उपक्रमाचे इतरांनी अनुकरण करणे गरजेचे आहे.
थेंब थेंब पाणी साचून तळे बनते एक एक झाडांपासून जंगल बनत म्हणून केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. पेरू तरच उगवेल या उक्ती प्रमाणे मे महिना म्हणजे फणस, आंबे, काजू ,चिंच , करवंदे ,जाम, जांभळे ,रांजणे अशा अनेक फळे खायची चंगळ असते. परंतु आपण या फळांचा आस्वाद घेऊन त्यांच्या बिया फेकून देतो. मात्र तसे न करता खाल्लेल्या फळांच्या बिया एक भांड्यात जमा करा. उदाहरणार्थ, तुम्ही आमरस केला त्या आंब्याचे बाठे, जांभळाचा रस काढलात त्या जांभळाच्या बिया, चींच जेव्हा कटिंग करतो त्याचे निघालेले चिंचोके, काजू ,फणस खाल्ल्यानंतर त्याच्या निघालेल्या बिया अशा अनेक फळांच्या बिया कृपया फेकून देऊ नका. त्या जमा करा त्यांना चांगल्या उन्हात सुकवा. नंतर एका पिशवीत किंवा गोणीत भरून ठेवा व त्या सर्व सुकलेल्या बिया पावसाळा सुरू होण्याअगोदर कुठल्या तरी किल्ल्याच्या सभोवती किंवा रानात, जंगलात किंवा कुठल्याही रस्त्याच्या दोन्ही बाजूस थोड्या थोड्या टाकत जा.
जर आपण एक हजार बिया या वर्षी पेरल्यात तर त्या बियांपैकी दहा जरी झाडे तरी नक्कीच उगवतील. यामुळे तुमच्या कष्टाचे सार्थक झाले असे समजा. आपण सर्व या धरती मातेचे व सृष्टीचे देणेदार आहोत. अशा प्रकारचा उपक्रम उरण केंगाव येथील सिडको कर्मचारी असलेले हितेंद्र सदाशिव घरत. गेली 25 वर्ष न चुकता लाखों बिया दरवर्षी कुठल्या ना कुठल्या जंगलात पेरत आहेत. यातील हजारो झाडे जगातील व त्यांच्या फळांचा आस्वाद सर्वांना घेता येईल व निसर्गाची जपवणूक केल्याचा आगळा वेगळा आनंद मिळत असल्याचे निसर्गप्रेमी हितेंद्र घरत यांनी सांगितले.
हितेंद्र घरत व त्यांचे कुटुंब हे इतरांनी खालेले फळ बिया आपल्या घरी आणून त्या धुवून, सुकवून आवषधिकरण करून जमवून ठेवतात. अशा प्रकारे 10 लाख बियांची साठवणूक करून त्याचे रविवार दि.2 जुलै रोजी नवी मुंबई खारघर येथील फणसवाडी डोंगरावर रोपण करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हितेंद्र घरत,त्यांच्या पत्नी,मुले व हिंदी सिनेमासृष्टीतील अभिनेत्री पुजा मॅडम, अभिनेते कुणाल मेश्राम,आचार्य ज्योतीषाचार्य मनमोहनजी, फोरेस्ट मुंबई विभाग चीफ मॅनेजर-सौ. बिरारी मॅडम, फोरेस्ट झोन मॅनेजर नवी मुंबई - बिरारी सर, ज्ञानेश्वर सोनावणे-समाजसेवक, डॉ. साठे,सिडको चे आर्किटेक सचिन माथनकर, आर्किटेक्ट आशिष चव्हाण, सिडको कर्मचारी युनियनचे जनरल सेक्रेटरी जे टी पाटीक, जॉईंट सेक्रेटरी सुभाष पाटील, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र माळी, निवृत्त पोलीस अधिकारी अरविंद संखे व रामचंद्र राऊत, सेवानिवृत्त मरिन ब्लॅक कॅट कमांडो रवी कुलकर्णी, अशोक कुमार शर्मा, भूषण शर्मा व नवी मुंबईचे जेष्ठ समाज सेवक परशुराम रघुनाथ पाटील, पत्रकार, मित्रमंडळी व हितचिंतक आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.