Type Here to Get Search Results !

म्हसळा घोणसे घाटात खासगी प्रवाशी बसचा भीषण अपघात, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची केली विचारपूस


म्हसळा घोणसे घाटात खासगी प्रवाशी बसचा भीषण अपघात

◆ तारीख आठ आणि 37 प्रवाशांच्या जीवाचा कर्दनकाळ ठरला घोणसे घाट

● घोणसे घाट पुन्हा ठरला कर्दनकाळ 

● प्रवासी बस दरीत कोसळली, 3 मृत्यू तर 34 जखमी

● गंभीर 15 प्रवाशांना उपचारासाठी माणगाव, महाड आणि अलिबाग येथे दाखल

• पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली.


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात प्रसिद्ध डेंजर झोन अशा घोणसे घाटात रविवार दि.08 मे 2022 रोजी सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान विरार, ठाणे ते श्रीवर्धन असे प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. सदर बस पन्नास ते साठ फूट खोल दरीत कोसळली असून या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 34 जण जखमी झाले आहेत. जखमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून काही अतिगंभीर असणाऱ्या जखमींना माणगाव, महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काहींना मुंबईत रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी सांगितले आहे. सदर बसचा अपघात झाला असल्याची माहिती मिळताच घोणसे परिसरातील आजूबाजूच्या गावातून तसेच म्हसळा शहरातून मदतीसाठी घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्याने जखमींना बाहेर काढण्यात यश आले.
नालासोपारा वरून एक खाजगी बस सुटली होती तिचा घोणसे घाटात अपघात झाला आहे. MH 04 FK 6616 असा या अपघात झालेल्या गाडीचा नंबर आहे. 
  याबाबत सविस्तर अशी की, विरार नालासोपारा येथुन श्रीवर्धनकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्राजक्ता ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 04 एफके 6614 या खासगी बसला घोणसे घाटातील तीव्र उतार वळणावर भीषण अपघात होऊन अपघातात 3 प्रवाशी ठार तर 34 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 15 प्रवाशी गंभीर आसुन त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव, अलिबाग येथे आणि महाड येथे हलविण्यात आले असल्याचे डॉ.सुशांत गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले. 10 ते 15 वर्षा पुर्वी अपघातास कर्दनकाळ ठरलेल्या घोणसे घाटात पर्यायी मार्ग झाले पासुन अपघातांची होत असलेली मालिका आणि जीवितहानी थांबलेली असतानाच प्राजक्ता ट्रॅव्हल चालकाने गाडी बेदरकारपणे चालवुन निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या जीवितहानीस कारणीभूत ठरला आहे. 
माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर म्हसळा पासुन 6 किमी अंतरावरील घोणसे घाटातील उताराचे शेवटच्या तीव्र वळणावर सकाळी 7:40 वाजताचे दरम्यान गाडी अंदाजे 60 फूट उंचावरून भरधाव वेगाने कोसळून भीषण अपघात झाला.
या अपघातामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील 
अश्विनी शैलेश बिरवाडकर, 
वय वर्षे 35,रा.धनगरमलई,
मधुकर बिरवाडकर,
वय वर्षे60, रा.धनगरमलई,
सुशांत रिकामे 
वय वर्षे 28,राहणार वडघर पांगलोली यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
 तर 34 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 15 प्रवासी गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार करण्यात आले आहे. 22 ते 25 प्रवासी क्षमता असलेल्या अपघाती बसमध्ये दोन चालकांसह 35 प्रवाशी मुंबई उपनगरातील विरार नालासोपारा येथुन बोर्ली - श्रीवर्धनकडे प्रवास करीत होते.
●●●●
अपघातात जखमींमध्ये 
वाहन चालक स्वप्नील दिलीप साळुंखे, रा.सातारा, चालक देवेंद्र भाईप विरार,रा.विरार, 

पार्थ बिरवाडकर, दिप बिरवाडकर, दिव्या बिरवाडकर, प्रतिभा बिरवाडकर (सर्व रा.धनगरमलई,)

सदानंद सोलकर, शैलेश सोलकर, विशाखा निमरे, विपुल निमरे (सर्व रा.देवखोल,)

नेहा थळे, सुप्रिया रिकामे, सुधीर रिकामे, सृती खळे, श्रेया खळे, वैदही खळे, (सर्व रा.नागलोली,)

पंकज बिरवाडकर, तुकाराम साबळे, सरस्वती साबळे, प्रतिभा बिरवाडकर,(सर्व रा.धनगरमलई,)

अभय पाडावे, भालचंद्र पाडावे, प्रेरणा पाडावे, वैष्णवी पाडावे, विजय पाडावे, वेदांत पाडावे, विर पाडावे, तेजस बिरवाडकर (सर्व रा.बोर्ली,)

शांताराम पवार, श्रावणी नटे, शास्वती खळे, निहाल खळे, मंदा पवार, वेदांत पाडावे (सर्व रा.खुजारे)

 हे प्रवाशी जखमी झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. अपघाताची म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन अधिक तपास सुरू आहे.
*अपघात होण्यापूर्वी गाडी घोणसे घाटात येताना दुसऱ्या तीव्र उतार वळणावर बस मधील एका बस चालकाने गाडीचा ताबा सोडुन दुसऱ्या बस चालकाला गाडी चालविण्यासाठी दिली होती. काही क्षणातच बस शेवटच्या तीव्र उतारावर कोसळली असे बस मधील किरकोळ जखमी प्रवासी सदानंद सोलकर- रा.देवखोल यांनी माहिती देताना सांगितले.
◆ पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
*अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी आणि म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भेट देवुन जखमींची विचारपूस केली. अपघातग्रस्तांना तातडीने सहकार्य करण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाचे संबंधितांना सांगितले. 
*घोणसे घाट पर्यायी मार्ग तीव्र उताराचा असला तरी पुर्वी सारखा अपघाती नसुन होणारे अपघात वाहन चालकाचे दुर्लक्षितपणाने किंवा गाडीत काही बिघाड झाल्यास अपघात होऊ शकतो. प्राजक्ता ट्रॅव्हल्सचा ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षात तीन ते चार अवजड वाहनांचा अपघात झाला होता मात्र जीवित हानी झाली नव्हती. बऱ्याच अवधी नंतर घोणसे घाट अपघातात एकाच वेळी तीन जण दगावण्याची घटना घडली आहे.
घोणसे घाटात ज्या ठिकाणी अपघात घडला आहे त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटची पक्की संरक्षण भिंत बांधली पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test