Type Here to Get Search Results !

• श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गणातील जिल्हा परिषद सदस्य, उपतालुकाप्रमुख, उपसरपंच, पदाधिकारी शेकडो शिवसैनिकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दाखल.• यापुढे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमय होण्यासाठी झटणार - उपतालुकप्रमुख सुकुमार तोंडलेकर• बोर्ली पंचतन जिल्हा परिषदेची उमेदवारी सुकुमार तोंडलेकर याना जाहीर


• श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गणातील जिल्हा परिषद सदस्य, उपतालुकाप्रमुख, उपसरपंच, पदाधिकारी शेकडो शिवसैनिकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दाखल.


• यापुढे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमय होण्यासाठी झटणार - उपतालुकप्रमुख सुकुमार तोंडलेकर


• बोर्ली पंचतन जिल्हा परिषदेची उमेदवारी सुकुमार तोंडलेकर याना जाहीर



रायगड वेध वैभव तोडणकर आदगाव 

जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही २४ तास झटतो, शिवसेनेतील तरुण कार्यकर्ता जनतेशी व विकासकामाशी प्रामाणिक असणारा कार्यकर्ता आमच्या सोबत असावा अशी आमची बऱ्याच कालावधी पासून इच्छा होती असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार सुनील तटकरे यांनी केले, श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन जिल्हा परिषद गणातील नाराज शिवसैनिकानी व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे शिवबंधन खाली उतरवीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यामध्ये श्रीवर्धन शिवसेना पक्षाचे शिलेदार बोर्ली पंचतन गणातील तडफदार उपतालुकप्रमुख सुकुमार तोंडलेकर, जिल्हा परिषद सदस्या सायली तोंडलेकर, बोर्ली पंचतन शाखाप्रमुख तथा उपसरपंच नंदू भाटकर तसेच शेकडो शिवसैनिकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. 
   शिवसेना पक्षाचे काम करीत असताना पक्षाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे निधी उपलब्ध होत नाही, वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने जनतेचे प्रश्न सोडविताना अनेक अडचणी येत आहेत यामुळे १९ जानेवारी २०२२ रोजी बोर्ली पंचतन जिल्हा परिषद गणातील पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे दिले होते परंतु त्यानंतर देखील पक्ष श्रेष्ठीना याच काहीच सोयरसुतक नसल्याने अखेरीस उपतालुकप्रमुख सुकुमार तोंडलेकर, जिल्हा परिषद सदस्या सायली तोंडलेकर यांच्या नेतृतवाखाली इतर पदाधिकारी जेष्ठ शिवसैनिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हा प्रवेश सोहळा आज रविवार ६ फेब्रुवारी रोजी एस ती स्टँड बोर्ली पंचतन येथे घेण्यात आला. 

या प्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत श्रीवर्धन मतदार संघ अध्यक्ष महंमद मेमन, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, उपाध्यक्ष सुचिन किर, महिलाध्यक्षा ज्योती परकर, हरेश्वर सरपंच अमित खोत, दिवेआगर सरपंच उदय बापट, बोर्ली पंचतन शहराध्यक्ष संतोष गायकर, मंदार तोडणकर, मुख्य संघटक नंदू पाटील, पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष हिदायत कुदरते, उपाध्यक्ष परवेझ मुकादम, माजी सभापती लाला जोशी, युवकाध्यक्ष सिद्धेश कोसबे तसेच विभागातील इतर पदाधिकरी व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
आपल्या भाषणात बोर्ली पंचतन जिल्हा परिषदेची उमेदवारी सुकुमार तोंडलेकर याना जाहीर करताना खासदार सुनील तटकरे

प्र
वेशकर्त्यांमध्ये श्रीवर्धन शिवसेना पक्षाचे शिलेदार बोर्ली पंचतन गणातील तडफदार उपतालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर, जिल्हा परिषद सदस्या सायली तोंडलेकर, बोर्ली पंचतन शाखाप्रमुख तथा उपसरपंच नंदकिशोर भाटकर, मनोहर परकर, युवासेना पदाधिकारी रुपेश नांदविडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अबुकलाम उंड्रे, मनोहर परकर, गौरव तोंडलेकर, यश तोंडलेकर, प्रशांत पडवेकर, सुरेश हेदुकर, मयूर परकर, संदिप कांबळे, सुजित शिसतकर, मनोज काते, राकेश खरवलीकर, सुबोध तोंडलेकर, नाना परबळकर, दत्ता मुकादम, अरूण ईवलेकर, दिनेश म्हाप्रोळकर, संदीप कांबळे, रूपेश दिवेकर, मुकेश दिवेकर, सुबोध तोंडलेकर, बंडया शिरवटकर, विनोद भंडारी, पिंट्या पडवेकर, दिलीप पडवेकर,अक्षय दिवेकर, वैभव कदम, किरण माळी, चंदया दिवेकर, करण शहा, ओमकार कदम, राकेश परकर, मयुर परकर, उदय परब, कौशिक तोडणकर, दिग्विजय मोरे, गौरव मोरे, अजिंक्य भाटकर तसेच  कुडकी, आदगाव येथील शिवसैनिक अशा अनेक शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आपल्या मनोगतानामध्ये सुकुमार तोंडलेकर म्हणाले की, माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्या झाल्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्यपद मिळाले पण पक्षाच्या माध्यमातून विकास निधी मिळालाच नाही, आम्ही 19 जानेवारी ला राजीनामे दिल्यानंतर 2 फेब्रुवारी पर्यंत पक्षाकडून कोणत्याही प्रकारे विचारणा होत नाही आणि आता आम्ही प्रवेश करतोय हे दिसल्यावर शिवसेनेचे पदाधिकारी प्रत्येक गावात सांगतायत की निधी मिळेल 2017 पासून आज पर्यंत निधी मिळाला नाही तर पुढील काही दिवसांत कसा मिळेल , पुढील वाटचाल कशी करावी असा मोठा प्रश्न माझ्या पुढे होता व कार्यकर्त्यांनी माझ्यावर निर्णय टाकला असताना निर्णय के घ्यावा असे विचारांचे वादळ मनात असताना सुनील तटकरे हीच प्रतिमा समोर आली आपल्याला अभिप्रेत विकासकामे व जनतेशी जुळलेले नाते टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमध्ये प्रवेश करीत आहोत, सुकुमार तोंडलेकर हे म्हणाले की, तटकरे साहेब आम्ही आज पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम सुरू करणार आहोतच पण आम्ही काही गावानं विकासकामे करण्याचे शब्द दिले आहेत ते आपणच पूर्ण निश्चित कराल अशी अपक्ष व्यक्त केली. 
 सुनील तटकरे  आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, आम्ही जनतेची 24 तास सेवा करण्यासाठी झटतो सुकुमार तोंडलेकर यांच्या सारखा जनतेशी नाळ जुळलेला कार्यकर्ता व विकासकामाशी प्रामाणिक असणारा कार्यकर्ता व त्यांचे शेकडो पाठीराखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत याने पक्षाला आणखी बळ निश्चित मिळेल, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहात आपण पुन्हा एक नवीन सुरुवात करा पक्षाचे पाठबळ आपल्या पाठीशी नक्की असेल, *काही लोक कृतघ्न  असतात ते फिरत्या रंगमंचसारखे इकडे तिकडे फिरत असतात त्यातील काही सोंगाडे असतात अशा शब्दांत उपजिल्हाप्रमुख शामकांत भोकरे यांचे नाव न घेता टीका केली, आम्ही आज जास्त काही बोलत नाही वेळ येईल व यापुढे कोणी जशी आमच्यावर टीका करेल त्याच पद्धतीत आम्ही शांतपणे उत्तर देऊ किंबहुना आजचा हा प्रवेश सोहळा त्याचेच एक उदाहरण असल्याचे तटकरे म्हणाले.*त्यामुळे आज जे काही बोललो त्यापेक्षा जास्त मनात आहेत असा इशाराही त्यांनी जणू विरोधकांना दिला. आम्ही जे बोलतो ते करत नाहीत असे बोलणारे इकडे आहेत त्यामुळे तुम्हाला आम्ही जो शब्द दिल आहे तो केव्हाच बदलणार नाही त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुकुमार तोंडलेकर हे बोर्ली पंचतन गणातील उमेदवार आहात तुम्ही व सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश सुनील तटकरे यांनी दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test