Type Here to Get Search Results !

🛑 तळा येथे गोहत्या करणाऱ्या १२ आरोपींना अटक, आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश


🛑 तळा येथे गोहत्या करणाऱ्या १२ आरोपींना अटक

🛑आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश

रायगड वेध तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर

तळा तालुक्यात गोहत्या करण्यात आल्याची घटना घडली असून १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की तळा तालुक्यातील मौजे कळमशेत गावाच्या हद्दीत अब्दुरम मुल्ला याच्या फार्म हाऊसवर गुरांच्या गोठ्यात दि.१३ रोजी गोहत्या करण्यात आल्याची माहिती तळा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्याठिकाणी गोहत्या झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी यामध्ये सहभागी आरोपी १) असीम अब्दुरम मुल्ला, २) सउद जावेद करदेकर, ३) परवेज अजीज कडू, ४) असिफ जलील फटाकरे, ५) मोहिन मुदाद मियाँ, ६) रिझवान रफिक टोळकर, ७) परवेझ महमदखान पठाण, ८) महमद हनिफ सत्तार गोलंदाज, ९) शाकीब सलाम अरब, १०) मनान बशीर फटाकरे, ११) माजिद उमर गोठेकर, १२) अफताफ नजीर पठाण(अल्पवयीन) सर्व राहणार वरचा मोहल्ला. यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाप्राणी संरक्षण अधिनियम १९७६ ५,५(c)६,९ (A) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पीएसआय शिवराज खराडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test