Type Here to Get Search Results !

म्हसळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस १००% खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या समवेत.


म्हसळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस १००%  खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या समवेत.

प्रदेशाध्यक्ष पदी सुनिल तटकरे आणि कॅबीनेट मंत्री म्हणून आमदार आदीतीताई तटकरे यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत

रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा

काल सायंकाळी म्हसळा तालुका .राष्ट्रवादी कॉंग्रेसची (रायगड जिल्हा महाराष्ट्र) बैठक सेंटर 1 प्लाझा मध्ये पक्षाचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांच्या अध्यक्षते खाली  झाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट आहे, त्यामुळे कार्यकर्ता ना दिशा देण्यासाठी झालेल्या बैठकीत माजी पंचायत समिती सभापती महादेव पाटील ,संजय दिवेकर, अनील बसवंत, संदीप चाचले,श्रीमती छाया म्हात्रे, संजय कर्णिक, समीर काळोखे, शाहीद उकये, माजी जी.प. सदस्य मनवे, प्रकाश गाणेकर, गजानन पाखड, अशोक काते,शुगुफ्ता जहांगीर वगैरे पदाधिकारी उपस्थित होते. 
यावेळी म्हसळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस १००%  खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या समवेत आसल्याचा ठराव,आणि शिंदे फडणवीस सरकार मध्ये कॅबीनेट मध्ये पाहिल्या महीला  मंत्री म्हणून निवड झालेल्या श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार आदीतीताई तटकरे यांच्या आभिनंदनाचा ठराव माजी सभापती महादेव पाटील यानी मांडला तो सर्वानुमते मंजुर करण्यात आला. रायगड- रत्नागिरी लोकसभा आणि श्रीवर्धन मतदार संघांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा  प्रचंड प्रभाव असून भविष्यांत विकासामुळे  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि मित्रपक्ष प्रभावी ठरणार आहे असे महादेव पाटील यानी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test