म्हसळा सार्वजनिक वाचनालयांत गुरु पोर्णिमा उत्सव साजरा : भारत मातेच्या प्रतिमेचे केले पूजन.
रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा
म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयांत आज सोमवार दि.३ जुलै रोजी गुरु-पोर्णिमा उत्सव साजरा करण्यात आलI यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला आणि हिंदू धर्माचे श्री.महाभागवत गीता, श्री महाभारत, श्री रामायण ,विश्वामित्र .संपूर्ण चातुर्मास श्रीमद दासबोध संस्कार साधना . सुखकर्ता श्री भगवत गीता आशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण ग्रंथांचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे,वरीष्ठ लिपीक विनोद सोनावणे, कृषी सेवक जी पी .देवडे कल्पना शेळके कृ.स म्हसळा आर बी .मगर ,कृ .प म्हसळा ,ग्रंथपाल
उदय करडे सा.वा. म्हसके लिपीक सायली चोगले,प्राची मेदाडकर इत्यादी उपस्थित होते
आषाढ पौर्णिमा व्रत दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते. आषाढ पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला. वेद व्यासांनीच चारही वेदांशी संबंधित ज्ञान सांगितले. त्यांच्या महान योगदानामुळे आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.असे विनोद सोनावणे यानी सांगितले.