Type Here to Get Search Results !

🛑महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार


🛑महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार

टिम रायगड वेध

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
 विद्यार्थी http://www.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.कोविड 19च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत घेता येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test