🛑भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा ऑलिम्पिक स्पर्धेतील अंतिम फेरीत दाखल
टिम रायगड वेध
बुधवारचा दिवस भारतासाठी उत्तम ठरला आहे. भालफेक स्पर्धेत भारताचा एथलीट नीरज चोप्रा याने सर्वोत्तम कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. नीरज चोप्राला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी ८३.५ मीटरचे आव्हान होते. परंतु त्याने ८६.६५ मीटरपर्यंत भालाफेक करून अंतिम सामन्यात दमदार प्रवेश केला. पात्रता फेरच्या अ गटात नीरज चोप्रा वरच्या क्रमांकावर आहे. नीरजकडून आता पदकाची अपेक्षा केली जात असून, सर्व भारतीयांच्या नजरा त्याच्या कामगिरीकडे खिळल्या आहेत.