Type Here to Get Search Results !

बोर्ली पंचतन येथील रिक्षाचालकांने घडवले माणुसकीचे दर्शन, प्रामाणिकपणे सापडलेले वॉलेट केले परत.


बोर्ली पंचतन येथील रिक्षाचालकांने घडवले माणुसकीचे दर्शन, प्रामाणिकपणे सापडलेले वॉलेट केले परत.


रायगड वेध मुजफ्फर अलवारे बोर्ली पंचतन


श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन मधील रिक्षाचालकाने माणुसकीचे दर्शन घडविल्याची घटना घडली आहे.आजही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण सर्वांना पुन्हा एकदा अनुभवास मिळाले.

सविस्तर घटना अशी की ९ मे रोजी बोर्ली पंचतन येथील पत्रकार मुझफ्फर अलवारे आपल्या मोटार सायकलने बोर्ली पंचतन बाजारपेठेत खरेदीसाठी जात असताना त्यांच्या जवळ असलेला वॉलेट बाजारपेठेत रस्त्यात पडुन गहाळ झाले. 

सदर वॉलेट मध्ये क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदी महत्त्वाची कागदपत्रे होती. सदर वॉलेट बाजारपेठेत गहाळ झाले आहे व सापडल्यास परत आणून देण्याबाबत त्यांनी सोशल मिडिया द्वारे आवाहनही केले होते. 

यादरम्यान बोर्ली पंचतन येथील रिक्षा चालक शादाब धनसे यांना हे वॉलेट बाजारपेठेत सापडले. त्यातील कागदपत्रे द्वारे त्यांनी त्वरित पत्रकार मुझफ्फर अलवारे यांच्या शी संपर्क साधला आणि त्यांना ते वॉलेट परत केले.

 प्रमाणिकपणे रस्त्यावर सापडलेले वॉलेट अलवारे यांना परत करुन उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी करत माणुसकीचे दर्शन घडविले.

आजच्या स्वार्थी दुनियेतही दाखविलेल्या माणुसकी मुळे, प्रामाणिकतेमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test