🛑अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तळा प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर
हवामान खात्याने जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर तळा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन दिवस अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने तळा नगरपंचायतीमार्फत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तळगडाच्या पायथ्याशी असलेल्या जोगवाडी व पुसाटी या वाड्यांना देखील सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नुकतीच महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून संपूर्ण गाव दरडीखाली गाढले गेल्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.त्यामुळे अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे नागरिकांना माईकद्वारे सूचना देऊन सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.